पुणे

राज्य सरकारची दूरदृष्टी ऐतिहासिक निर्णयामुळे शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना फायदा होणार - स्वाती टकले

नितीन देशपांडे 39532   22-06-2025 20:09:01

हडपसर प्रतिनिधी (Hadapsar Undri ) - : राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तुकडा बंदी कायदा रद्द करण्यात आला आहे, याबाबत विधानसभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी घोषणा घोषणा केली आहे, यामुळे आता लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख स्वातीताई टकले (pune shivsena mahila president swati takale) वतीने पेढे भरवत आनंद उत्सव साजरा करण्यात आला, 

यावेळी शिवसेनेच्या पुणे महिला जिल्हाप्रमुख स्वातीताई टकले (Swati takale) यांनी महायुती सरकारचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Shivsena Eknath Shinde)उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजय बापू शिवतारे (vijay shivtare)यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी त्या म्हणाल्या की, शेतकऱ्यांबरोबर शहरातील नागरिकांना देखील तुकडा बंदीचा निश्चित मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे अनेक वर्षापासून एक दोन तीन गुंठ्याचे खरेदीखत बंद होते त्यामुळे नागरिक संभ्रमात होते, या संदर्भात राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पुरंदर विधानसभेचे आमदार विजय बापू शिवतारे यांनी अनेक वेळा पाठपुरवठा केला होता, शहराची वाढती लोकसंख्या पाहता आजच्या या सरकारच्या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे महायुती सरकारचे पुरंदर विधानसभा मतदारसंघ महिला शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख स्वातीताई टाकले यांनी सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून हा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी सुरू होती. अखेर हा कायदा आता सरकारने रद्द केला आहे. विधानसभेत या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात घोषणा करताना लवकरच आम्ही एक एसओपी या संदर्भात जारी करू, ज्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचं काम अधिक सोप होईल, त्यांना सरकार दरबारी हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

काय आहे तुकडा बंदी कायदा?

तुकडा बंदी कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जमीन खरेदी किंवा विक्री करण्यात प्रतिबंध होता, एक, दोन, तीन अशी गुंठ्यामध्ये जमीन खरेदी किंवा विक्री करता येत नव्हती, मात्र आता हे निर्बंध हटवले जाणार आहेत.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.