मुंबई उपनगर

पिंपरी-चिंचवडमध्ये हनुमान जयंतीनिमित्त ११११ भक्तांचे सामूहिक पठण

शिंदे राम 59   11-04-2025 17:54:07

पुणे (livemaharashtra.co.in) आमदार आणि भाजप शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड शहरात यंदा श्री हनुमान जयंती विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी होणार आहे. या विशेष कार्यक्रमांतर्गत शनिवारी, १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ वाजता काळेवाडी येथील आरंभ बँक्वेट हॉल येथे १,१११ भक्तांच्या उपस्थितीत श्री हनुमान चालीसाचे सामूहिक पठण होणार आहे.

या भक्तिमय कार्यक्रमासोबतच शहरात प्रथमच पारंपरिक भारतीय जोर-बैठक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीचे जतन आणि प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे वयोगट आणि पारितोषिके पुढीलप्रमाणे:

वयोगट १० ते १५ वर्षे:

– प्रथम पारितोषिक – ₹५००१ आणि प्रशस्तीपत्रक

– द्वितीय – ₹४००१ आणि प्रशस्तीपत्रक

– तृतीय – ₹३००१ आणि प्रशस्तीपत्रक

वयोगट १५ ते २० वर्षे:

– प्रथम – ₹६००१ आणि प्रशस्तीपत्रक

– द्वितीय – ₹५००१ आणि प्रशस्तीपत्रक

– तृतीय – ₹४००१ आणि प्रशस्तीपत्रक

वयोगट २० ते २५ वर्षे:

– प्रथम – ₹७००१ आणि प्रशस्तीपत्रक

– द्वितीय – ₹६००१ आणि प्रशस्तीपत्रक

– तृतीय – ₹५००१ आणि प्रशस्तीपत्रक

स्पर्धेसाठी नियम व अटी:

1. नावनोंदणी आवश्यक आहे (ऑनलाइन किंवा ऑफलाइन)

2. स्पर्धेचे नियम आयोजक ठरवतील

3. दिलेल्या वेळेत जास्तीत जास्त जोर-बैठका करणाऱ्या स्पर्धकास पारितोषिक

नावनोंदणीची अंतिम मुदत: ११ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

नावनोंदणीसाठी संपर्क: 

–जोर-बैठक स्पर्धा: काळूराम नढे – 9922908522

हनुमान चालीसा पठण:आकाश भारती – 9545142477

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात भक्तिभावासोबत आरोग्य आणि परंपरेचा संगम घडणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.