तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात आणली. या योजनेच्या माध्यमातून महायुतीने जोरदार प्रचार करत महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या आर्थिक तिजोरीवर भार पडत असल्याचं बोललं जात होते. त्यानंतर या योजनेचा फेर आढावा घेण्यात आला. त्यातून अपात्र असणाऱ्या महिलांना वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला. डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या २ कोटी ४६ लाख इतकी होती, ती जानेवारीत २ कोटी ४१ लाख एवढी झाली. लाडकी बहीण योजनेतून कमी झालेल्या ५ लाख बहिणींपैकी अनेकांचे वय ६५ वर्षाहून अधिक झाल्यानं त्यांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेतील अटीनुसार २१ ते ६५ वयोगटातीलच महिलांना महिन्याला १५०० रूपये देण्यात येतात.