नागपूर

मोठी बातमी! निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडे भेटले, पाया पडले अन्. जरांगेंच्या दाव्याने खळबळ

नितीन देशपांडे 127   03-02-2025 13:07:56

Dhananjay Munde : मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगेपाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे ह विधानसभेपूर्वी मला भेटायला आले होते असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

धनंजय मुंडे निवडणूकपूर्वी मला भेटायला आले होते. 8 दिवसांपासून फोन येत होते. रात्री 2 वाजता आले, सोबत कराड होता. आणि मला सांभाळा असे म्हटलं. मी झोपलो होतो ते आत आले. त्यांनी कराडची ओळख करून दिली. त्यावेळी मी त्यांना हर्व्हेस्टरचे पैसे बुडवणार असं त्यांना म्हटलं होतं. त्यांनी लक्ष राहुद्या असं म्हटलं. जाताना पाया पडले, असा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी केला. दरम्यान, आरोपींना यंत्रणा सोडणार नाही, टोळी धनंजय मुंडे यांची आहे, आरोपींना लपवत आहे. याच्या एका नेत्याने जिवंतपणी मरण-यातना भोगल्या या टोळीमुळे, असा दावाही मनोज जरांगे यांनी यावेळी केला.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.